मी
आ. श्री. दीपकआबा बापूसो साळुंखे, आपल्या सेवेत नतमस्तक. माझा संपूर्ण पत्ता: मु.पो. जवळे, ता. सांगोला, जि. सोलापूर (महाराष्ट्र) पिन - ४१३३०७. मी बी.ए. ऑनर्स आणि एल.एल.बी. (१) शिक्षण पूर्ण केले आहे. माझी जन्मतारीख ०७ जानेवारी १९६२.
माझ्या कार्यरत पदभारात, मी विद्याविकास मंडळ जवळे, ता. सांगोला, जि. सोलापूर येथे अध्यक्ष म्हणून काम करीत आहे. तसेच सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना, लि.वाकी (शिवणे), ता. सांगोला, जि. सोलापूर येथे चेअरमन आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सोलापूर येथे संचालक आहे.
मी कै. आमदार काकासाहेब साळुंखे-पाटील वाहतूक सहकारी संस्था मर्यादित सांगोला तालुका जि. सोलापूर आणि बळीराजा फलोत्पादक सहकारी संस्था मर्या. सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य संस्थापक आहे.
कॉलेजमध्ये असताना एन.एस.यू.आय.चे कार्य राज्यभरात प्रभावीपणे पार पाडले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य म्हणूनही कार्यरत आहे. जिल्हा परिषद सदस्य म्हणून यशस्वीपणे काम करुन सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रतिमा निर्माण केली आहे.
गेल्या २० वर्षांपासून जिल्ह्यातील जिल्हापरिषद, दूध संघ, जिल्हा मध्यवर्ती बँक, लेबर फेडरेशन यांसारख्या सहकारी संस्थांमध्ये कार्यरत आहे. सोलापूर जिल्हा दूध संघाचे मार्गदर्शक म्हणून यशस्वीपणे काम केले आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील शैक्षणिक संकुल उभारून शिक्षणाचे जाळे निर्माण केले आहे. २३/१२/२००७ रोजी बाळवा जिल्हा कोल्हापूर येथील आदर्श फौंडेशन या संस्थेमार्फत राज्यस्तरीय आदर्श सहकाररत्न पुरस्कार सन्मानित, ०९/०२/२००८ रोजी ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेड सर्कल महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय सहकारभूषण पुरस्काराने सन्मानित, २००९ साली सोलापूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघातून विधानपरिषद सदस्य म्हणून निवडून आले.
सोलापूर जिल्ह्यातील कृषी, आरोग्य, रस्ते, वीज, सहकार, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक अशा सर्वच प्रश्नांच्या संदर्भामध्ये विधानपरिषदेच्या आमदारकीच्या माध्यमातून सभागृहामध्ये कोणत्याही पक्ष, पार्टी, गट, तट, याचा विचार न करता आवाज उठविला आहे. विविध प्रश्नांची सोडवणूक करून घेतली आहे.
रात्रंदिवस फक्त आणि फक्त विकास कामे करत असताना, या देशाचे थोर नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांचा विश्वास, आणि या देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री मा. सुशिलकुमार शिंदे साहेब व सर्व पक्षीय नेते यांची मोलाची साथ मोठ्या प्रमाणात मिळाली आहे.
मी शाहु-फुले-आंबेडकरांच्या विचारांची जपणूक करीत, कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही हा भाव मनी बाळगून जिल्ह्यातील प्रत्येक समाजाची निस्वार्थ सेवा करीत आहे. सर्वधर्म समभावाची जपणूक करतानाच मुस्लिम, दलित तसेच होलार समाजाच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मंत्रालयस्तरावर बैठकांचे आयोजन करून प्रश्न मार्गी लावले आहेत. घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महामनवी संदेश घेऊन समता-बंधुता या मूल्याची जपणूक करीत जिल्ह्यातील शेतकरी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेसाठी कार्यरत आहे.
धन्यवाद,