preloader

व्हिजन


Nira kalva Images
    जलसिंचन योजना
  • नीरा उजवा कालवा मुळ प्रकल्पामध्ये सांगोला शाखा समावेश करून लाभ क्षेत्रातील गावांना हक्काचे पाणी मिळवून देणार.
  • टेंभू, म्हैशाळ व नीरा उजवा कालवा योजनेंतून लाभक्षेत्रातील सर्व छोटे मोठे तलाव व बंधारे वर्षातून दोन वेळा भरून देणार.
  • जिहे-काठापूर योजनेंतून राजेवाडी तलावात पाणी सोडून लाभ क्षेत्रांना हक्काचे पाणी मिळवून देणार.
  • सांगोला व पंढरपूरच्या वाट्याचे वीर धरणाचे पाणी स्वतंत्र पाईपलाईनद्वारे लाभक्षेत्राच्या वाट्याचे वाया जाणारे पाणी आणून हजारो हेक्टर शेतीला पाण्याचा लाभ मिळवून देणार.
  • उजनी जलाशयातील २ टीएमसी मंजूर असलेले पाणी बंद पाईपलाईनद्वारे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहचवणार.
  • सांगोला तालुक्यातील एक हेक्टरही क्षेत्र शेती पाण्यापासून वंचित राहू नये म्हणून कोणत्याही सिंचन योजनेत समाविष्ट नसलेल्या वंचित गावांना पाणी मिळवून देणार.

    शैक्षणिक
  • स्पर्धा परीक्षा व संरक्षण दलात भरतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्र व आंतरराष्ट्रीय दर्जाची अभ्यासिका आणि क्रीडांगण उभारणार.
  • उच्च शिक्षणासाठी पुणे-मुंबई सारख्या महानगरांत शिक्षण घेणाऱ्या सांगोला मतदार संघातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह उभारणार.
  • सांगोला येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे विस्तारीकरण करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोर्सेस सुरू करणार.
  • सर्व शिक्षक व अंगणवाडी सेविकावरील अशैक्षणिक कामाचा भार कमी करून विद्यार्थ्यांना १००% ज्ञानदानाच्या पवित्र कार्यास प्रोत्साहन देणार.
  • विधानसभा मतदार संघात कृषी महाविद्यालय व नर्सिंग कॉलेज उभारण्यास प्रयत्नशील राहणार.
  • मतदार संघात व्यवसाय आधारित शैक्षणिक केंद्रे उभारणार.
Smart Education

Image
    सामाजिक बांधिलकी
  • सामाजिक सलोखा व शांतता टिकवून मतदार संघ भयमुक्त व गुंडगिरी मुक्त करणार.
  • लोककलाकार, लोककलावंत यांच्या समस्या सोडविण्यास कटीबद्ध.
  • माजी सैनिक, पत्रकार यांच्यासाठी स्वतंत्र भवन उभारणार.
  • मतदार संघातील प्रत्येक बेघर कुटुंबाला हक्काचे आणि पक्के घर मिळवून देणार.
  • मतदार संघातील डोंगरी क्षेत्रात समावेश असलेल्या गावांचा कायापालट करणार.
  • दिव्यांगांचे प्रश्न सोडवून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार.
  • सांगोला विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गाव आणि वाडीवस्तीवर व्यायामशाळा उभा करणार.
  • निरपेक्षपणे काम करणाऱ्या सर्वच सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार.

    औद्योगीकरण
  • नोकरी व्यवसायानिमित्त महानगरात जाणारे लोंढे रोखण्यासाठी सांगोला मतदार संघामध्ये मोठे उद्योग निर्मितीसाठी सर्व सोयींनीयुक्त सुसज्ज अशी एम.आय.डी.सी. उभा करून बेरोजगारी कमी करण्यास प्रयत्न करणार.
  • दुग्धव्यवसाय व दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया उद्योग सुरू करण्यास चालना देणार.
  • लघुउद्योगाच्या माध्यमातून घोंगडी, जान, लोकरीच्या वस्तू व बचत गट उत्पादीत वस्तू यांचे ब्रॅंडिंग करून निर्यातीला चालना देणार.
  • देशभरातील गलाई बांधवांच्या व्यवसायाचा लघु व सूक्ष्म उद्योगामध्ये समावेश करावा यासाठी आवाज उठवणार.
  • छोटे व्यापारी, टपरीधारक, फिरते व्यवसाय करणाऱ्या लहान व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार.
  • अल्पसंख्याक समाजातील तरुणांसाठी अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या माध्यमातून विविध उद्योगांना चालना देणार.
MIDC

Farming
    शेती आणि माती - पुरक व्यवसाय
  • शेतकरी गटाच्या माध्यमातून बळीराजाला ताकद देणे व शेतीमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार.
  • नाशवंत शेतीमाल साठवण करणेसाठी कोल्ड स्टोरेज व प्रक्रिया उद्योग उभारणार.
  • शेतकऱ्याचे उत्पादन वाढीसाठी शेळी, मेंढी पालन, कुक्कुट पालन, पशुपालन व शेतीपूरक व्यवसायासाठी चालना देणार.
  • डाळींब पट्टयात स्वतंत्र डाळींब संशोधन केंद्र उभा करून तालुक्यातील डाळींब उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर मार्ग काढणार.
  • डाळींबासह अन्य फळबाग प्रक्रिया उद्योगाला चालना देवून उत्पादीत होणाऱ्या मालास आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करणार.

    महिला सबलीकरण
  • आर्थिक विकास व्हावा म्हणून लघु व गृहउद्योग उभारण्यास चालना देत महिलांसाठी अर्थसहाय्य मिळवून देण्यास प्रयत्नशील.
  • दिव्यांग, विधवा, परित्यक्ता, वीर माता व वीर पत्नी यांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील.
  • शेतकरी, कष्टकरी महिलांसाठी शासकीय योजनेचा लाभ देण्यास कटीबद्ध.
  • शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच मुलींना स्वसंरक्षणाचे धडे मिळावेत यासाठी शासनदरबारी प्रयत्नशील.
mahila sablikaran

Government Scheme
    प्रशासकीय सुविधा
  • प्रशासकीय कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत व प्राधान्याने व्हावीत यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी समन्वय राखणार.
  • सांगोला शहरात उपप्रादेशिक परिवहन (आर.टी.ओ.) कार्यालय सुरू करणार.
  • सांगोला शहरात उपविभागीय प्रांत कार्यालय सुरू करणार.
  • सांगोला शहरात उपविभागीय पोलीस (डी. वाय. एस. पी.) कार्यालय सुरू करणार.
  • सांगोला शहरात उपविभागीय कृषी कार्यालय सुरू करणार.
  • सांगोला तालुक्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व पोलीस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करणार.

    वीजेबाबत स्वयंपूर्ण
  • मतदारसंघात सौर उर्जा व पारंपारिक उर्जा स्रोत उभारण्यास चालना देणार.
  • लघु व कुटीर उद्योगांना अल्पदरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार.
  • मागेल त्या शेतकऱ्यांना नवीन डीपी उपलब्ध करून देणार तसेच जळालेला डीपी २४ तासात दुरुस्त करण्याची तरतूद करणार.
Electricity

Nagarparishad
    नगरपरिषद
  • शहरातील सर्व महापुरुषांच्या स्मारकांचे सुशोभीकरण करून ज्या महापुरुषांची स्मारके नाहीत त्या महापुरुषांची स्मारके उभा करणार.
  • शहरात वाड्यावस्त्यांवर रस्ते, पथदिवे यांसह इतर नगरी सुविधा पुरविणार.
  • क वर्ग नगरपरिषदेचे ब वर्ग नगरपरिषदेत रुपांतर करण्यासाठी प्रयत्न करणार.
  • क्रीडा संकुलाचा विकास करून आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यायामशाळा उभारणार.
  • शहरात तसेच मोठ्या गावांत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार.
  • माजी सैनिकांसाठी स्वतंत्र हॉस्पिटल उभारणार.
  • मुलांसाठी बालोद्यान उभारून त्यामध्ये आधुनिक व अद्ययावत खेळणी बसविणार.
  • सांगोला शहरासह मतदारसंघातील सर्वच मोठ्या गावांत भाजी मार्केट उभारणार.

    कष्टकरी व असंघटित कामगार

    कष्टकरी कामगारांना कामाच्या ठिकाणी सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार. साखर कारखाना, वीटभट्टी, दगडखाण, हमाल, माळी, आर्किटेक्ट, ड्रायव्हर, हॉटेल कामगार यांना विमा आणि सुरक्षा योजना मिळवून देण्यासाठी कार्यरत राहणार. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.